क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
राजस्थान येथील उदयपूर येथे टेलरकाम कन्हैयालाल याचा निर्घृणपणे खून करण्यात आला. हा खून करत असताना व्हिडीओ तयार करून समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आला. यामुळे देशात वातावरण बिघडणार आहे. या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी जे या घटनेत सामील आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने उपतहसीलदार कोलकार यांना देण्यात आले.
यावेळी क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष अभिलाष देसाई, रमेश पाटील, दिलीप सोनटक्के, संदीप शेमले, नारायण पाटील, निरंजन बिरजे, दीपक तिनईकर, अजय लोहार, महादेव देसाई, विनोद पावले यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









