मागील वर्षात 25 टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा : गुंतवणूकदारांचा ‘या’ पर्यायाकडे वाढता कल
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
गुंतवणूकदारांना सिल्व्हर एक्स्चेंज ट्रेडेड फंडमध्ये पसंती असल्याचे दिसून येत आहे. चांदी ईटीएफ याद्वारे गुंतवणूकदारांना शेअर्सप्रमाणे चांदीमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. गेल्या 1 वर्षात 25 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. या संदर्भातील अधिकची माहिती खालील प्रमाणे-
ईटीएफ म्हणजे काय?
चांदीसारखे शेअर्स खरेदी करण्याच्या सुविधेला सिल्व्हर ईटीएफ म्हणतात. हे एक्सचेंज-ट्रेडेड फंड आहेत, जे स्टॉक एक्स्चेंजवर खरेदी आणि विकले जाऊ शकतात. चांदीच्या ईटीएफचा बेंचमार्क स्पॉट सिल्व्हर किमती असल्याने, ग्राहकांना चांदीच्या वास्तविक किंमतीच्या जवळपासच्या किंमतीत ते खरेदी करता येऊ शकते.
कमी प्रमाणात चांदी खरेदीची संधी
ईटीएफच्या मदतीने युनिटमध्ये चांदी खरेदी करता येते. यामुळे कमी प्रमाणात किंवा एसआयपीद्वारे चांदी खरेदी करणे सोपे होते. सिल्व्हर ईटीएफच्या 1 युनिटची किंमत सध्या 100 रुपयांपेक्षा कमी आहे. याचा अर्थ तुम्ही यामध्ये 100 रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक सुरू करू शकता.
चांदी सुरक्षित राहते
इलेक्ट्रॉनिक चांदी डिमॅट खात्यात ठेवली जाते ज्यामध्ये फक्त वार्षिक डीमॅट शुल्क भरावे लागते. तसेच चोरीची भीती नाही. भौतिक चांदीच्या चोरीच्या जोखमीव्यतिरिक्त, त्याच्या सुरक्षेवर देखील खर्च केला जातो.
व्यापारात सुलभता
सिल्व्हर ईटीएफ कोणत्याही त्रासाशिवाय त्वरित खरेदी आणि विकता येऊ शकतात. याचा अर्थ जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असेल तेव्हा तुम्ही ते विकू शकता.
सिल्व्हर ईटीएफमध्ये गुंतवणूक कशी करावी?
सिल्व्हर ईटीएफ खरेदी करण्यासाठी डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. यामध्ये, एनएसई किंवा बीएसईवर उपलब्ध असलेल्या सिल्व्हर ईटीएफची युनिट्स खरेदी करता येतात.









