वृत्तसंस्था / पोर्ट ऑफ स्पेन
क्रिकेट विंडीजच्या नव्या प्रमुख ऑपरेटींग अधिकारी म्हणून (सीओओ) लिनफोर्ड इनव्हेररी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इनव्हेरेरी यांच्याकडे या जबाबदारीबरोबरच प्रमुख कार्यकारीपद (सीईओ) सोपविण्यात आले आहे.
येथे झालेल्या विंडीज क्रिकेट मंडळाच्या संचालकांच्या बैठकीमध्ये हा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. लीनफोर्ड इनव्हेरेरी यांना विंडीज क्रिकेट मंडळामध्ये गेल्या 10 वर्षांच्या कालावधीतील चांगलाच अनुभव असून त्यांनी आतापर्यंत या मंडळात विविध पदे यशस्वीपणे भूषविली आहेत. इनव्हेरेरी यांनी आपले हे नवे पद 1 ऑक्टोबर रोजी स्वीकारले आहे.









