नवी दिल्ली :
चीनी टेक कंपनी विवो यांनी बुधवारी (25 सप्टेंबर) भारतीय बाजारात विवो व्ही40 मालिकेतील नवीन स्मार्टफोन ‘विवो व्ही40 इ’ सादर केला आहे. स्मार्टफोनमध्ये 80व्हॅटच्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5500एमएएच बॅटरी, 2000 एनआयटीएस पीक ब्राइटनेससह 3डी अमोलेड वक्र डिस्प्ले आणि 50 एमपी सेल्फी कॅमेरा असेल.
विवो व्ही40इ स्मार्टफोनला आयपी64 रेट केलेले धूळ आणि पाण्यापासून संरक्षण दिले गेले आहे. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि बॅक पॅनलवर
ऑरा लाइट आहे, जे नोटिफिकेशन ब्लिंकर म्हणूनही काम करणार असल्याची माहिती आहे. स्मार्टफोनची किंमत 33,999 रुपये आहे. दोन्ही स्मार्टफोन्सच्या प्री-बुकिंगवर 5000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.