चिमणीची जागा घेतली श्वानाने
वॉशिंग्टन
जगातील दिग्गज उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटरची धुरा ऑक्टोबर 2022 मध्ये आपल्या हातात घेतल्यापासून ट्विटर नेहमीच विविध कारणास्तव चर्चेत राहिले आहे. यामध्ये सीईओंची बदली, कर्मचारी कपात, यासोबतच ट्विटरवरील टिकच्या नियमावलीत केलेला बदल यासोबतच आता तर मस्क यांनी ट्विटरच्या ब्लॉगिंग साइटवरील लोगोच बदलून टाकला आहे. अगोदरचा निळ्या चिमणीचा लोगो बाजूला करत त्या ठिकाणी त्यांनी एका श्वानाचा लोगो सादर केला आहे.
सॉफ्टवेअर इंजिनिअर बिली मार्कस आणि जॅकसन पालमर यांनी 2013 मध्ये बिटकॉइन यासारख्या अन्य काही क्रिप्टोकरन्सींची खिल्ली उडवण्यासाठी डॉजकॉइनची सुरुवात केली होती.
या निर्णयाने युजर्स नाराज?
ट्विटरने लोगो बदलल्यानंतर ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. या बदलामुळे एकमेकांना युजर्स प्रश्न विचारत आहेत. यातूनच क्ष्अउं टेंड ट्विटरवर सक्रीय झाला आहे.









