पूर्ण चार्जवर 175 किमी धावणार असल्याचा दावा : किंमत अंदाजे 89,999 रुपये
नवी दिल्ली :
ओबेन इलेक्ट्रिकने ओबेन रोअर ईझेड इलेक्ट्रिक बाइक भारतात लॉन्च केली आहे. कंपनीचा दावा आहे की, दुचाकीचे टॉप मॉडेल पूर्ण चार्ज केल्यावर 175 किमीची रेंज देते. तसेच सदरची दुचाकी फक्त 45 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. बेंगळूरूस्थित स्टार्टअपने वेगवेगळ्या बॅटरीपॅक पर्यायांसह इलेक्ट्रिक बाइक तीन प्रकारांमध्ये सादर केली आहे. या दुचाकीची सुरुवातीची किंमत 89,999 रुपये एक्स-शोरूम आहे, जी टॉप व्हेरियंटसाठी एक्स-शोरूम 1.09 लाख रुपये आहे. ग्राहक 2,999 रुपये बुकिंग रक्कम भरून बाईक बुक करु शकतात.









