बेंगळूर :
सणासुदीचा हंगाम खास बनवत, टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने कार खरेदीदारांसाठी टोयोटा रुमियनची फेस्टिव्हल एडिशन सादर केली आहे. रुमियनचे सौंदर्य आणि आराम वाढवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली आणि खास टोयोटा जेन्युइन अॅक्सेसरी (टीजीए) पॅकेजचे वैशिष्ट्या असलेली ही लिमिटेड-एडिशन, हा सणासुदीचा हंगाम उत्साहाने आणि स्टाईलमध्ये साजरा करण्यासाठी योग्य पर्याय आहे.
कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट सबरी मनोहर लाँच करताना म्हणाले, “आम्ही टोयोटा रुमियनची लिमिटेड-एडिशन सादर करताना खूप आनंदी आहोत, जे वाहनाचे केवळ सौंदर्य आणि आरामच वाढवत नाही तर उत्तम ड्रायव्हिंग अनुभवाची देखील खात्री देते. दिवाळीच्या सणाचा उत्साह पाहता, आमच्या ग्राहकांना विशेष मूल्य देण्याची आमची वचनबद्धता अतूट आहे.”









