किंमत 74 हजारापुढे : अनेक वैशिष्टय़ांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिरो मोटो कॉर्प कंपनीची नवी पॅशन एक्सटेक ही बाईक विविध वैशिष्टय़ांनी युक्त अशी नुकतीच सादर करण्यात आली आहे. सदरच्या गाडीची किंमत 74 हजारापुढे असणार आहे. या बाईकवर कंपनीने 5 वर्षांची वॉरंटी दिली असून या वाहनामध्ये ब्ल्युटूथ कनेक्टिव्हीटीची सोय असणार आहे. कंपनीने पहिल्यांदाच आपल्या या नव्या मॉडेलमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प दिलेला आहे. आधीच्या हॅलोजन दिव्याच्या तुलनेमध्ये नवा दिवा 12 टक्के अधिक चांगला प्रकाश देऊ शकणार आहे. पावसाळय़ाच्या दिवसामध्ये नव्या हेडलॅम्पमुळे चालकांना चांगले दिसू शकणार आहे.
ही असणार वैशिष्टय़े
ब्ल्युटूथ कनेक्टिव्हीटीमुळे फोन कनेक्ट करता येणे शक्य होणार आहे. स्मार्टफोन चार्ज करण्याच्या सुविधेसह रियल टाईम मायलेज इंडिकेटर आणि लो फ्युल ऍलर्ट या सुविधाही यात असतील. 12 लिटर इंधन क्षमतेची टाकी या गाडीला असणार असून प्रति लिटर मागे 68 किलो मीटर इतके मायलेज ही गाडी देणार आहे.









