2025 पर्यंत बाजारात दाखल होण्याची शक्यता
केपटाऊन :
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लिमिटेडने ‘फ्यूचरस्केप’ या जागतिक कार्यक्रमात इलेक्ट्रिक थारच्या संकल्पनेतील मॉडेलचे सादरीकरण केले आहे. ही गाडी 5 दरवाज्यांची इलेक्ट्रिक एसयूव्ही कंपनीच्या बॉर्न इलेक्ट्रिक श्रेणीचा भाग राहणार आहे. याचे नाव थार इ राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे झालेल्या कार्यक्रमात महिंद्राने स्कॉर्पिओ एन एसयूव्हीवर आधारीत ‘ग्लोबल पिकअप’ ट्रक आणि ‘ओजेए’ नावाचा नवीन प्लॅटफॉर्म सादर केला आहे. कंपनीच्या लाइनअपमध्ये समाविष्ट असलेल्या हलक्या वजनाच्या ट्रॅक्टरसाठी हे महिंद्रा राइजने विकसित केले आहे.
महिंद्राचे म्हणणे आहे की, नवीन इलेक्ट्रिक थार सध्याच्या आयसीइ थारची आवृत्ती नसणार आहे. ती कंपनीच्या नवीन ओएनजीएलओ पी1 प्लॅटफॉर्मवर आधारीत राहणार आहे.