सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव संपूर्णा कारंडे उर्फ गुंडेवाडी यांची लोकअदालत या विषयावर शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी आकाशवाणीवर मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता सिंधुदुर्गनगरी आकाशवाणीच्या एफ एम १०३.८ मेगाहाईट्स किंवा NewsOnAir अँप वर ही मुलाखत ऐकता येणार आहे. आकाशवाणीच्या प्राची पालव यांनी ही मुलाखत घेतली असून डॉ. सुनील गायकवाड यांनी सादर केली आहे.









