कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात जबरी चोऱ्या, घरपोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद केलेली आहे. पोलिसांनी एकूण 5 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 36 गुन्हे उघडकीस आलेल्या आहेत. तर 35 लाख 83 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या संबंधीची माहीती पत्रकार परिषदेत देताना जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी माहिती दिली ते म्हणाले, “कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोडी आणि जबरी चोऱ्यांचे प्रमाण वाढलं होतं. या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत कोल्हापूर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून एका आंतरराज्य टोळीच्या मुस्क्या आवळलेल्या आहेत.” अशी माहीती दिली.
या कारवाईबद्दल अधिक माहीती देताना ते म्हणाले, “जळगाव हुबळी परिसरात राहणाऱ्या या चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीकडून 131 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, चोरीची पल्सर मोटर सायकल, एक बेकायदेशीर 9 एमएम पिस्टलचे 24 जिवंत राऊंड आणि एक मॅक्झिन, एक क्रेटा कार, एक एक्सेस दुचाकी असे एकूण 35 लाख 83 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले पाचही गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावरील एकूण 36 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.” अशी माहीती जिल्हा अधिक्षकांनी दिली.








