प्रतिनिधी/ बेळगाव
रविवार दि. 18 फेब्रुवारी रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे उत्तर विभागातील काही भागात पुढील तीन दिवस पाणीपुरवठ्यातही व्यत्यय निर्माण होणार आहे. एलअॅण्डटी कंपनीने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
रविवार दि. 18 ते मंगळवार दि. 20 फेब्रुवारीपर्यंत टीबी वॉर्ड पंपहाऊसपासून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या उत्तर विभागातील डेमो झोनमध्ये पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे. सदाशिवनगर, अयोध्यानगर, नेहरुनगर, आझमनगर, शाहूनगर, शिवबसवनगर, वैभवनगर, सत्यसाई कॉलनी परिसरात तीन दिवस पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.









