सिकंदर शेख-तेजा दिल्ली यांच्यात प्रमुख लढत
बेळगाव : चंदूर येथे यात्रा कमिटीच्यावतीने भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार दि. 16 जानेवारी रोजी या मैदानात भारत-इराण इशा प्रमुख लढती होणार आहेत. चंदूर येथे यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदानात प्रमुख लढत आमदार केसरीसाठी म्हणून महाराष्ट्र केसरी, महान भारत केसरी सिकंदर शेख वि. भारत केसरी दिल्लीचा तेजा यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकासाठीची चंदूर केसरीसाठी कुस्ती जलाल-इराण वि. विक्रांत कुमार-दिल्ली, तिसऱ्या क्रमांकाची सभापती केसरीसाठी उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत वि. हिंदकेसरी विरेंद्रकुमारचा-हरियाणा यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती सरपंच केसरीसाठी महाराष्ट्र केसरी बालारफीक शेख वि. पंजाब केसरी सुपिंदर सिंग,
पाचव्या क्रमांकासाठी उपसरपंच केसरी जयदीप युपी वि. पृथ्वीराज पाटील-पुणे, सहाव्या क्रमांकासाठी शुभम सिद्धनाळे वि. हरिषकुमार-पंजाब, सातव्या क्रमांकासाठी श्रीमंत भोसले-इचलकरंजी वि. सागर तामकरे-कोल्हापूर, आठव्या क्रमांकाची कुस्ती शुभम कोळेकर-कोल्हापूर वि. उदयकुमार-उत्तरप्रदेश, नवव्या क्रमांकाची कुस्ती पागलबाबा ताडी वि. अब्दुल-कोलकत्ता यांच्यात चंदूर केसरीसाठी लढती होणार आहेत. त्याशिवाय महिला मल्लांना प्राधान्य देण्यासाठी महिलांच्या कुस्त्याही आयोजित करण्यात आल्या आहेत. महिला सरपंच केसरीसाठी प्रतीक्षा बागडी-सांगली वि. ऋतुजा बिल्ले-इचलकरंजी, दुसऱ्या क्रमांकासाठी प्रतिभा कांबळे-इचलकरंजी वि. सोमय्या नागरमुन्नोळी-कर्नाटक चॅम्पियन यांच्यात होणार आहे. याशिवाय लहान, मोठ्या 50 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.









