आखाती देशांतून येणार पहिले विमान : दुबई, मस्कत, ओमान, बहरिनमध्ये विमाने : ‘एअर गल्फ’ची लवकरच थेट विमानसेवा
विशेष प्रतिनिधी / पणजी
अवघ्या 110 दिवसांमध्ये 10 लाख प्रवाशांची सोय करणाऱ्या मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जूनच्या पहिल्या आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहे.
विमानतळ प्रकल्पातील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यात गल्फ देशातून विमान प्रवाशांना घेऊन या विमानतळावर येईल. त्यानंतर चार दिवसांत आणखी एक विमान येणार आहे. पावसाळी पर्यटनासाठी आखाती राष्ट्रांतून काही लोक गोव्यात येतात.
जूनच्या अखेरीस व जुलैमध्ये केंद्रीय विद्यालयांना वार्षिक सुट्टी असते. त्यामुळे आखाती राष्ट्रांमध्ये असलेल्या मूळ भारतीयांना आपल्या मुलांना घेऊन गोव्यात येणे सोपे होते. त्यामुळेच विदेशात स्थायिक असलेले भारतीय मोठ्या प्रमाणात जूनच्या अखेरच्या आठवड्यात गोव्यात पोहोचतात आणि जुलैच्या अखेरच्या आठवड्यात तसेच ऑगस्टमध्ये पुन्हा विदेशात जात असतात.
दुबई, मस्कत, ओमान, बहरिनसाठी थेट विमाने
अशा प्रवाशांसाठी जास्तीत जास्त विमाने ही दिल्ली, मुंबई किंवा कोचीमध्ये थेट येतात. यानंतर ही विमाने आता थेट गोव्यात मोपा येथे उतरतील. आखातातील अनेक राष्ट्रांतील मूळ गोमंतकीयांसाठी मोपा विमानतळावर उतरणे हे जास्त सोयीस्कर होणार आहे. गोवा ते दुबई, गोवा ते मस्कत, गोवा ते ओमान, गोवा ते बहरिन अशा अनेक ठिकाणी जाण्यासाठी मोपा येथून विमाने यंदा सुऊ होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय विमानांसाठी स्वतंत्र विभाग
मोपा विमानतळ प्रकल्पावर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा स्वतंत्र विभाग सुऊ झाला आहे. एअरबससाठी आवश्यक ती सारी यंत्रणा मोपा विमानतळावर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोड नंबर जो आवश्यक आहे, तो देखील या विमानतळ प्रकल्पाला प्राप्त झाला आहे.
‘एअर गल्फ’ची लवकरच थेट विमानसेवा
मोपा विषयकची सविस्तर माहिती देणारा रोड शो अलिकडेच मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनी जीएमआरने दुबई येथे केला होता. तिथे कित्येक विमान कंपन्यांचे अधिकारी सहभागी झाले होते. आखातातील एअर गल्फ ही कंपनी लवकरच मोपावऊन आखाती राष्ट्रात जाण्यासाठी थेट विमानसेवा सुऊ करण्याच्या प्रयत्नांत आहे.
मोपा विमानतळ प्रकल्प आता आंतरराष्ट्रीय विमाने तसेच प्रवाशांच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात हा विभाग कार्यान्वित होईल, अशी माहिती जीएमआरच्या सूत्रांनी दिली.








