प्रतिनिधी/ पणजी
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) व्यवस्थापनाने शुक्रवारपासून त्यांच्या आंतरराष्ट्रीय हवाई कार्गो टर्मिनलचे कार्य सुरू केले आहे. ज्यामध्ये मोपा ते लंडन गॅटविकपर्यंत मालवाहतूक सुरू आहे. ज्यामध्ये प्रमुख मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीचा समावेश आहे.
2020 मध्ये ग्रांधी मल्लिकार्जुन राव (जीएमआर) यांनी अंदाज केला होता की, 2045 पर्यंत गोव्यातून मालवाहतूक 1,00,000 मेट्रिक टन ओलांडली जाईल. मोपा येथील कार्गो हाताळणी सुविधेचा फायदा गोव्याच्या उद्योगांना, विशेषत: राज्यातील फार्मा उद्योगाला होण्याची शक्यता आहे.









