वॉशिंग्टन :
भारताचा नागरिक बदर खान सूरीला अमेरिकेत सोमवारी अटक करण्यात होती. हमासचा प्रचार केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई झाली होती आणि त्याचे डिपोर्टेशन करण्याची तयारी सुरू होती. परंतु ऐनवेळी अमेरिकेच्या न्यायालयाने या डिर्पोटेशनला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत न्यायालयाचा आदेश येत नाही तोवर त्याला अमेरिकेतून हाकलले जाऊ नये असा आदेश वर्जीनिया कोर्टच्या न्यायाधीश पेट्रीसिया टोलिवर गिल्स यांनी दिला आहे. सूरी हा जॉर्जटाउन विद्यापीठाचा विद्यार्थी आहे.









