1984 शीख विरोधी दंगलप्रकरणी दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
1984 च्या शीखविरोधी दंगलीतील पुल बंगश हत्या प्रकरणाशी संबंधित खटल्यात काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम जामीन मंजूर केला. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती विकास धुल्ल यांनी टायटलर यांना दिलासा देताना काही अटीही घातल्या आहेत. त्यानुसार या खटल्यातील पुराव्यांशी छेडछाड करता येणार नाही तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना देशही सोडता येणार नाही. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात गुऊवारी याप्रकरणी सुनावणी झाली होती. त्यानंतर निर्णय शुक्रवारसाठी सुरक्षित ठेवण्यात आला होता.









