मुंबई
गृहकर्जधारकांसह कार खरेदी करणाऱ्या कर्जधारकांना बँक ऑफ महाराष्ट्रने दिलासा दिला आहे. बँकेने आपल्या गृहकर्ज, वाहनकर्ज व्याजदरात कपात केली आहे. महाराष्ट्र बँकेने गृहकर्ज व्याजदर 8.6 टक्के वरून 8.5 टक्के कमी केला आहे. तर कार कर्ज व्याजदर 8.9 टक्के वरून 8.7 टक्के इतका कमी केला आहे. सदरचे नवे सुधारीत व्याजदर ग्राहकांकरिता 14 ऑगस्ट 2023 पासून लागू झाले असल्याचे बँकेने म्हटले आहे.









