महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेलींचे आश्वासन ; सावंतवाडीतील व्यापाऱ्यांशी साधला संवाद
सावंतवाडी । प्रतिनिधी
शहरातील व्यापारी आणि स्टॉलधारकांच्या समस्यांची आपल्याला जाणीव आहे. त्यासंदर्भात विधानसभेत आवाज उठवू आणि मागण्यांचा पाठपुरावा करू. अशी ग्वाही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी दिली. श्री तेली यांनी महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसमवेत शहरातील व्यापाऱ्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . .यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, निशांत तोरस्कर,अमोल सारंग संदीप वेंगुर्लेकर शब्बीर मणियार तेजस कोटलेकर विशाल बागकर इक्बाल शेख श्रीधर धडाम वैभव म्हापसेकर आधी उपस्थित होते यावेळी श्री तेली यांनी सहकाऱ्यांसमवेत पाचशेहून अधिक मतदारांशी संवाद साधला यावेळी त्यांना शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तर यावेळी शहरातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देऊ असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.









