प्रतिनिधी/निपाणी: सीमाप्रश्नाच्या दाव्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेले वक्तव्य व त्याला महाराष्ट्रातील नेत्यांकडून मिळालेले प्रत्युत्तर याचा पाfरणाम दोन्ही राज्यांदरम्यान होणार्या वाहतुकीवर झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी काहि काळ आंतरराज्य मार्गावर होणारी वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले.
औरंगाबाद येथे कर्नाटक पाfरवहनच्या बसेस रोखल्यानंतर खबरदारी म्हणून शुक्रवारी सकाळी महाराष्ट्रातील बसेस सकाळी 6 ते 9 या वेळेत निपाणी आगारात आल्या नव्हत्या. कोल्हापुरातून गडहिंग्लज, आजरा या मार्गावर जाणार्या बसेस कापशीमार्गे वळवण्यात आल्या होत्या. अचानक झालेल्या या बदलामुळे प्रवाशांचा पुरता गोंधळ उडाला होता. निपाणी आगाराच्या कोल्हापूर मार्गावर होणार्या काहि बसफेर्याहि थांबवण्यात आल्या होत्या.
मात्र पाfरस्थिती नियंत्रणात असल्याची खात्री पटल्यानंतर सकाळी 9 नंतर निपाणीतून होणारी आंतरराज्य वाहतूक सुरळीत सुरू झाली. दरम्यान, कोणताहि अनुचित प्रकार घडू नये म्हणून शुक्रवारी दिवसभर राज्य राखीव पोलिसांची तुकडी बसस्थानक पाfरसरात तैनात करण्यात आली होती. तसेच निपाणी शहर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसुर, ग्रामीणचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, बसवेश्वर चौकचे उपनिरीक्षक आनंद कॅरीकट्टी यांच्या नेतृlवाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









