वृत्तसंस्था /नवी दिल्ली
हॉकी इंडियातर्फे पहिल्यांदाज उपकनिष्टांची आंतरविभागीय हॉकी स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेला रविवारपासून झारखंडमधील रांची येथे प्रारंभ होत आहे.
हॉकी इंडियाची उपकनिष्ट पुरूषांची आंतरविभागीय स्पर्धा रांची येथे तर उपकनिष्ट महिलांची आंतरविभागीय हॉकी स्पर्धा हरियाणातील नरवाना येथे घेतली जाईल. या स्पर्धेमध्ये पुरूषांच्या विभागात एकूण सहा संघांचा समावेश असून ते दोन गटात विभागण्यात आले आहेत. अ गटात उत्तर विभाग, दक्षिण विभाग आणि साई तर ब गटात पूर्व विभाग, पश्चिम विभाग आणि अकादमी यांचा समवेश आहे. उपकनिष्ट महिलांच्या विभागातील सहासंघ दोन गटात विभागण्यात आले आहेत. अ गटात उत्तर विभाग, पूर्व विभाग आणि साई तर ब गटात दक्षिण विभाग, पश्चिम विभाग, साईशक्ती आणि अकादमी यांचा समावेश आहे. सदर स्पर्धा सात दिवस चालणार आहे.









