पुणे / वार्ताहर :
पुणे जिल्ह्यातील विविध भागात दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या दोन म्होरक्यांसह नऊ जणांच्या टोळीस पुणे पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 10 लाख रुपये किंमतीच्या 29 दुचाकी जप्त केल्या आहेत.
अमोल नवनाथ मधे, विजय संजय मधे, संतोष उमेश मधे, संदिप सुभाष मधे, विकास साहेबराव मधे (सर्व रा. पारनेर, अहमदनगर), विजय विठ्ठल जाधव, सुनील वामन मेंगाळ, भारत पोपट मेंगाळ, मयुर गंगाराम मेंगाळ (सर्व रा. संगमनेर, अहमदनगर) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक शिळीमकर हे जिल्ह्यातील दुचाकी चोरांचा आढावा घेत असताना दुचाकी चोरी करण्याची वेळ, निवडलेली ठिकाणे, त्यासाठीचे येणारे-जाणारे मार्ग तसेच चोरटय़ांनी अवलंबलेली पध्दत याचा बारकाईने अभ्यास करत त्यांनी कारवाईसाठी प्रथम पुणे-नाशिक रस्त्याची निवड केली. त्यासाठी दोन पथकंही तयार केली. तपासादरम्यान या दोन पथकांनी आंतरजिल्हा टोळीच्या दोन म्होरक्यांसह नऊ जणांना जांबूत फाटा परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे व घरफोडी चोरीचे एकूण 26 गुन्हे उघडकीस आले असून, 10 लाख रुपये किंमतीच्या 29 मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
अधिक वाचा : कुख्यात गुंड सचिन मानेसह 13 जणांवर मोक्का कारवाई









