भारतीय दलित महासंघाचा इशारा
ओटवणे प्रतिनिधी
मणिपूर येथील स्त्रियांवर झालेला अत्याचार तसेच शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे ऊर्फ मनोहर कुलकर्णी यांनी राष्ट्रपुरुष महात्मा जोतिबा फुले आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा भारतीय दलित महासंघ जाहीर निषेध करत असल्याचे भारतीय दलित महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष किशोर जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
मणिपूर येथील घटनेबाबत शासनाने दोषींवर अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तसेच संभाजी भिडे यांच्या महामानवांच्या बदनामीकारक वक्तव्यामुळे बहुजन समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचा सर्वत्र जाहीर निषेध करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने संभाजी भिडे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा संघटनेच्या माध्यामातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय दलित महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष किशोर जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.









