छ. संभाजी महाराज क्रीडा संकुल सातारा, शिर्के ग्राऊंड येथे होणार ३० रोजी स्पर्धा
प्रतिनिधी
बांदा
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेतील मुलांच्या गटात येथील विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नुतन माध्यमिक विद्यालय, इन्सुलीच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे. या विद्यार्थ्यांची निवड कोल्हापूर विभागीय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने नुतन माध्यमिक विद्यालय, इन्सुलीचे मुख्याध्यापक यांना पत्र पाठवून या निवड झालेल्या खेळाडूंना विभागीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कळवले आहे. यामध्ये कु.गोरक्ष राजेश आजगावकर, कु.सखाराम शशिकांत खानोलकर, कु.वृषभ विनय गावडे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सदर स्पर्धा ३०ऑक्टोबर 2025 रोजी श्री छ. संभाजी महाराज क्रीडा संकुल सातारा, शिर्के ग्राऊंड येथे होणार आहे. या विद्यार्थ्यांना सहा शिक्षक राजेश आजगावकर, विनोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्या विकास मंडळ इन्सुलीचे अध्यक्ष अशोक सावंत, सचिव गुरुनाथ पेडणेकर, खजिनदार सदानंद कोलगावकर, सर्व संचालक, सल्लागार व मुख्याध्यापक सुविद्या केरकर यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.









