प्रतिनिधी
बांदा
सोलापूर येथे 10 ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन व सोलापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुला-मुलींच्या मीनी गट राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघात नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुलीचे विद्यार्थी कु. जनार्दन महेंद्र सावंत व कुमार गोरक्ष राजेश आजगावकर यांची गौरवशाली निवड झाली आहे.या दोन विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्या विकास मंडळ इन्सुलीचे अध्यक्ष अशोक सावंत, सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, सर्व सल्लागार, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य, नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या दोन्ही विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री विनोद चव्हाण सर आणि श्री राजेश आजगावकर सर यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले आहे .









