आमदार असिफ सेठ, मनपा आयुक्तांकडून पाहणी
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार असिफ सेठ आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी फोर्ट रोडच्या कामाची पाहणी केली. रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने ते तातडीने पूर्ण करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. गणेशोत्सव तोंडावर आला असल्याने आमदार असिफ सेठ यांनी आपल्या मतदारसंघातील रस्ते व इतर कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच मनपा आयुक्त शुभा बी. व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फोर्ट रोडच्या कामाची त्यांनी पाहणी केली. काम पूर्ण करण्याची डेडलाईन पूर्ण झाली असली तरी कामाला विलंब झाल्याने त्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची सूचना संबंधितांना केली. तसेच स्थानिक रहिवासी व व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी युवा नेते अमन सेठ व इतर उपस्थित होते.









