जुलै-सप्टेंबर तिमाहीमधील आकडेवारीचा समावेश : एका अहवालामधून माहिती सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशातील रहिवासी बांधकाम क्षेत्रात संस्थात्मक गुंतवणूक 71 टक्क्यांनी वाढून 298.3 दशलक्ष डॉलरची झाली आहे. रिअल इस्टेट कन्सल्टंट वेस्टियन यांनी एका अहवालात ही माहिती दिली आहे. वर्षापूर्वी याच कालावधीत, गृहनिर्माण क्षेत्रात संस्थात्मक गुंतवणुकीचा आकडा 174.3 दशलक्ष डॉलरचा होता.
एकंदर रिअल इस्टेट क्षेत्रात तिमाहीत 679.9 दशलक्ष डॉलरची एकूण संस्थात्मक गुंतवणूक झाली आहे. अहवालात असे म्हटले आहे की भारतीय रिअल इस्टेट क्षेत्राला 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत एकूण 679.9 दशलक्ष डॉलरची संस्थात्मक गुंतवणूक प्राप्त झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीतील 374.3 दशलक्ष डॉलरपेक्षा 82 टक्के अधिक आहे.
कार्यालयीन जागेची मागणी वाढण्याची शक्यता
वेस्टियनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास राव म्हणाले, सप्टेंबर तिमाहीत संस्थात्मक गुंतवणुकीचा वेग मंदावला आहे. मात्र, आता मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात बोलावत असल्याचे राव यांनी सांगितले. ज्यामुळे आगामी काळात देशात ऑफिस स्पेसची मागणी वाढू शकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.









