सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर सध्या एका नववधूची जोरदार चर्चा सुरू आहे. या नववधूच्या एका कृतीने सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. ही नववधू विवाहाच्या दिवशी मंडपात न जाता एका वेगळय़ाच ठिकाणी पोहोचली होती. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्स तिचे कौतुक करत आहेत.

व्हायरल व्हिडिओत एक युवती कारमध्ये नववधूच्या वेशात बसलेली दिसून येते. तिला पाहून ती विवाहस्थळी जात असल्याचे मानल्यास चुकीचे ठरणार नाही, परंतु नंतर काहीतरी वेगळेच घडते. ही युवती विवाहस्थळी न जाता थेट महाविद्यालयात जाते, तेथे ही युवती विवाहापूर्वी प्रात्यक्षित परीक्षेत सहभागी झाल्याचे व्हिडिओत दिसून येते. ही युवती खरं म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयात शिकविण्याचे काम करते. तिच्या विवाहाच्या दिवशीच प्रात्यक्षिक परीक्षा असल्याने ती प्रथम महाविद्यालयात पोहोचते. तिची ही कृती पाहून सर्वजण थक्क होतात. नववधूची ही कृती पाहून सगळेच थक्क झाले असून हा व्हिडिओ मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्स कॉमेंट करत असून एका इन्स्टाग्राम अकौंटवरुन तो शेअर करण्यात आला आहे









