दिवाळीच्या फराळामध्ये जर तुम्हाला आणखीन एक चटपटीत आणि खमंग पदार्थ वाढवायचा असेल तर बाकरवडी हा उत्तम पर्याय आहे. पण बरेच जण बाकरवडी बाजारातूनच विकत आणतात.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बाकरवडीची सोपी, झटपट रेसेपी सांगणार आहोत.या दिवाळीला तुम्हीदेखील घरच्याघरी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता.
साहित्य
२ वाट्या मैदा
३ चमचे बेसन
१ चमचा ओवा
चवीपुरते मीठ
तेल
सारणासाठी लागणारे साहित्य
१ चमचा तीळ
३ चमचे लाल तिखट
४ चमचे बारीक शेव
१ छोटा चमचा गरम मसाला
१ चमचा धनेपूड
१ चमचा जिरेपूड
१ छोटा चमचा बडीशेप
१ चमचा किसलेले सुकेखोबरे
१ चमचा पिठी साखर,
३ चमचे चिंच गुळाची चटणी
चवीनुसार मीठ
कृती
सर्वप्रथम एका परातीमध्ये मैदा आणि बेसन एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ आणि ओवा घालावा. तेल गरम करून पीठात घालावे आणि पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. आणि १५-२० मिनिटे बाजूला ठेवावे.यानंतर कढईमधे तीळ आणि खोबरे हलकेसे भाजून घ्यावे. आणि त्यामध्ये लाल तिखट,गरम मसाला,धनेपूड जिरेपूड, बडीशेप, पिठी साखर आणि चवीनुसार मीठ हे सर्व जिन्नस घालावेत.आणि मिक्सरवर हलकेसे वाटून घ्यावे.यांनतर मळलेल्या पिठाची मोठी पारी लाटून घ्या. त्यावर चिंच गुळाची चटणी लावावी. या पारीवर सारण आणि बारीक शेव घाला. त्याचा घट्ट बारीक रोल बनवून घ्या. नंतर जास्त जोर न लावता त्याचे बारीक काप करून घ्या. नंतर ५-७ मंद ते मध्यम आचेवर गरम तेलामध्ये गोल्डन ब्राउन तळून घ्यावेत.बाकरवडया थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात.
Previous Articleमल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष
Next Article सावंतवाडीत बाल रुग्णांचे मोफत सर्जरी शिबिर संपन्न









