बऱ्याच लोकांच्या दिवसाची सुरुवात ही पोह्यांपासून होते. कमी वेळेत बनणारे आणि चवीला रुचकर असणारे पोहे सर्वानाच आवडतात. कांदापोहे, दडपे पोहे,बटाटा पोहे,तर्री पोहे असे पोह्यांचे बरेच प्रकार तुम्ही खाल्ले असतील. पण आज आपण पोह्यांपासून एक वेगळी रेसिपी जाणून घेणार आहोत. जी झटपट देखील बनते आणि स्वादिष्टही आहे.
साहित्य
पोहे – एक वाटी
रवा -पाव वाटी
३ चमचे दही
१ बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथिंबीर
अर्धा चमचा आले पेस्ट
मीठ
पाणी
तेल
कृती
सर्वप्रथम पोहे भिजवून घेऊन ५ मिनिटे बाजूला ठेवावेत. यांनतर त्यामध्ये ३ चमचे दही,रवा,कांदा ,कोथिंबीर, आले पेस्ट,तसेच चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण चमच्याने एकजीव करून घ्यावे.गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालून मिश्रण १० मिनिटे बाजूला ठेवावे. यामुळे रवा चांगला भिजेल. यानंतर आप्पे पॅन मध्ये तेल घालावं.आणि मिश्रण त्यामध्ये घालून आप्पे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावेत. तयार झालेले स्वादिष्ट,कुरकुरीत आप्पे खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व्ह करावेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









