भजी हा असा पदार्थ आहे जो सगळ्यांनाच आवडतो. त्यात पावसाळा आणि भजी हे समीकरणचं आहे. आपण वेगवेगळ्या भजी बनवत असतो. प्रत्येक भजीची चवही भिन्न असते. आज आपण अशाच प्रकारची स्वादिष्ट आणि कुरकुरीत भजीची रेसिपी पाहणार आहोत. ही भजी बनवायला ही सोपी आहे आणि खायला देखील रुचकर आहे.
साहित्य
फ्लॉवर
१ चमचा लसूण आले पेस्ट
१ कप बेसन पीठ
१/४ कप तांदळाचे पीठ
२ चमचे तेल
१ चमचा ओवा
चवीनुसार मीठ
१ चमचा मिरची पावडर
हळद
तेल
कृती
सर्वप्रथम एका भांड्यामधे पाणी गरम करा. नंतर त्यामध्ये मीठ टाकून पाण्याला उकळी येऊ द्या. यानंतर त्यामध्ये ३ ते ४ मिनिट फ्लॉवरचे छोटे छोटे तुकडे घालून शिजवून घ्या. आणि त्यातील संपूर्ण पाणी गाळून घ्या. यानंतर एका भांड्यात बेसन पीठ,तांदळाचे पीठ, ओवा, मीठ,तिखट,हळद,घालून सर्व मिक्स करा. आता त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून भजीच्या बटरप्रमाणे पीठ तयार करून घ्या. यानंतर त्यामध्ये आले लसूणाची पेस्ट घाला. आता गॅसवर तेल गरम करा. आणि पिठामध्ये फ्लॉवरचे तुकडे घालून ते तळून घ्या. गरमागरम आणि स्वादिष्ट भजी चहासोबत सर्व्ह करा.









