जैन युवा वेदिकेची महापौरांकडे मागणी
बेळगाव : महापालिका सभागृहात भगवान महावीरांचे तैलचित्र बसविण्यात यावे, या मागणीचे निवेदन शुक्रवारी जैन युवा वेदीकेच्यावतीने महापौर मंगेश पवार यांना देण्यात आले. तसेच यावेळी महापौरांना भगवान महावीरांची मूर्ती भेट देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. महापालिकेतील जुन्या इमारतीच्या सभागृहात भगवान महावीरांसह अन्य महापुरुषांचे तैलचित्र बसविण्यात आले होते. महापालिका नवीन इमारतीत स्थलांतरीत झाल्यानंतर भगवान महावीरांचे तैलचित्र बसविण्यात आले नाही. 10 एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सभागृहात भगवान महावीरांचे तैलचित्र बसविण्यात यावे, अशी मागणी यावेळी जैन युवा वेदीकेच्यावतीने महापौर मंगेश पवार यांची भेट घेऊन करण्यात आली.









