काही भागात समस्या : युजर्सना लॉगिनमध्ये अडचणी
नवी दिल्ली
भारतामधील काही भागांमध्ये इंस्टाग्राम डाऊन होत ते वापरण्यात अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये डाऊन डिटेक्टर वेबसाईटनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यावेळी आउटेजची समस्या समोर आली. यामध्ये युजर्सना ऍप लॉगिन करण्यात अडचणी आल्याचे व्हिडीओ व फोटो शेअरिंग करत ऍप डाऊन झाल्याच्या तक्रारी युजर्सनी ट्विटर व दुसऱया प्लॅटफॉर्मवर सादर केल्याचे दिसले आहे.
ऍप युजर्सना अधिक समस्या
डाऊन डिटेक्टरच्यानुसार इंस्टाग्राम डाऊन होण्यासाठी सर्वाधिक रिपोर्ट ऍप्सशी संबंधीत आहेत. जवळपास 44 टक्के तक्रारी ऍप्स युजर्सनी केली आहेत. सर्व सर्व्हर कनेक्शन 39 टक्के आणि 17 टक्के तक्रारी या वेबसाईट्शी संबंधीत आहेत.
डाऊन झालेली ठिकाणं
इंस्टाग्राम डाऊन झाल्याच्या तक्रारी बुधवारी सकाळी जवळपास 9.45 वाजता वाढल्या आणि 12.45 वाजेपर्यंत 3,226 रिपोर्ट नोंदवण्यात आले. यामध्ये भारतामधून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत दिल्ली, जयपूर, लखनौ, मुंबई, बेंगळूर आणि दुसऱया मोठय़ा शहरांमध्ये ही समस्या निर्माण झाली होती.









