जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्तांनी मार्गावरून केली पायपीट
बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि वाहतtक नियंत्रण अधिकार्यांनी चन्नम्मा सर्कल ते कपिलेश्वर विसर्जन तलावपर्यंतच्या विसर्जन मार्गाची पाहणी केली. यावेळी चन्नम्मा सर्कल ते विसर्जन मार्गातील अडथळे त्वरित दूर करण्यासह खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी अधिकार्यांना केल्या.
गणेशात्सव अवघ्या काहि दिवसांवर आला असून महाराष्ट्राप्रमाणे बेळगावमध्येहि मोठ्या उlसाहात गणेशउत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवाची वेगळी परंपरा बेळगावकरांनी जपली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. चन्नम्मा सर्कल ते कपिलेश्वर तलावापर्यंतच्या मार्गात गणपत गल्ली, मारुती गल्लीसह शहरातील मुख्य भाग येतो. त्यामुळे या मार्गावर मोठी वर्दळ असते शिवाय अनेक दुकानेहि मार्गात थाटलेली असतात. त्यामुळे गणेशात्सव काळात या गोष्टी अडथळा ठरून नयेत यासाठी आज जिल्हाधिकारी नितेश पाटील, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, पोलीस आयुक्त एस. एम. सिद्रमप्पा यांच्यासह वाहतtक नियंत्रण विभागाच्या अधिकार्यांनी या विसर्जन मार्गाची पाहणी केली.
गणेशोत्सव काळात नागाfरकांना पुलाखालून जाता यावे यासाठी कपिलेश्वर पुलाखालील रस्त्याची डागडूजी करण्यासह विसर्जन तलाव स्वच्छ करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.









