कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट
बेळगाव : सांबरा येथील बेळगाव विमानतळ परिसरात नव्या टर्मिनल बिल्डींगच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी राबविण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व घनकचरा व्यवस्थापन याची माहिती घेण्यासाठी कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. नव्या टर्मिनल बिल्डींगमध्ये एकाच वेळी 2400 विमान प्रवासी ये-जा करण्याची क्षमता असणार आहे. प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने त्यामानाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विमानतळ परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे त्याच ठिकाणी व्यवस्थापन करण्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या. विमानतळ संचालक त्यागराजन यांनी अधिकाऱ्यांना नव्या टर्मिनल बिल्डींगची माहिती दिली.









