शाहूवाडी प्रतिनिधी
गेले अनेक दिवस प्रलंबित असलेल्या शाहूवाडी तालुक्यात एमआयडीसी उभा करण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी’ संबंधित विभागाचे अधिकारी व ‘तहसीलदार यांच्या समवेत शाहुवाडी तालुक्यात तीन ठिकाणी जागेची पाहणी केली. आवश्यक ती माहिती संबंधित विभागाकडून घेतली.
तालुक्यात औद्योगिक दृष्ट्या कोणतीच प्रगती झालेली नाही. तालुक्यातील युवकांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी या माध्यमातून शाहूवाडी तालुक्यात एमआयडीसी उभा रहावी. यासाठी खा धैर्यशील माने यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. चार दिवसापूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘उद्योग मंत्री उदय सामंत ‘ पालकमंत्री दीपक केसरकर ‘ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ‘ यांच्या समवेत बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ जागा पाहणी करण्याचे आदेश देऊन एमआयडीसीसाठी तत्त्वतः मान्यता दिली.
या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यंशील माने यांनी एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील ‘एमआयडीसी’चे आरओ राहुल भिंगारे ‘अधीक्षक अभियंता गावडे ‘शाहूवाडी’चे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या समवेत अमेणी ‘वारूळ’ डोणोली या ठिकाणच्या जमिनीची पाहणी करून एमआयडीसीबाबत आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा याबाबत अधिक माहिती घेतली .
दरम्यान, खासदार धैर्यशील माने व उद्योग विभागाचे अधिकारी यांनी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना जागे बाबतची अधिक माहिती घेऊन अहवाल सादर करावा अशी सूचना दिली . यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील . शिवसेनेचे तालुका अध्यक्ष विजयसिंह देसाई तलाठी श्री जाधव ‘श्री कडू ‘सुभाष जामदार शासकीय अधिकारी ‘कर्मचारी ‘ पंचायत समितीचे माजी सदस्य अमर खोत ‘ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते