बार असोसिएशनने केलेल्या तक्रारीची दखल
बेळगाव : न्यायालयाच्या आवारातील इमारती खराब झाल्या आहेत. अनेक इमारतींना गळती लागली आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे बार असोसिएशनने तक्रार केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारातील विविध इमारतींची शनिवारी पाहणी केली. याबाबत सरकारकडे पाठपुरावा करून तातडीने त्या इमारतींची दुरुस्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयाच्या आवारातील कॅण्टीन, महिलांचे चेंबर, जुनी लायब्ररी, काही न्यायालयीन इमारती खराब झाल्या. त्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याला याबाबत योग्य ते पाऊल उचलण्याची सूचना देऊ असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बार असोसिएशनला दिले आहे. जिल्हा न्यायालयाच्या आवारातील अनेक इमारती जिर्ण झाल्या आहेत. काही इमारतींना गळती लागली आहे. तर काही इमारतींच्या भिंती खराब झाल्या आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. या आवाराचा विकास होणेदेखील गरजेचे आहे. काही ठिकाणी गटारीवरील स्लॅब कोसळले आहे. तसेच काही इमारतींच्या परिसरात तसाच कचरा पडून आहे. तोदेखील सार्वजनिक बांधकाम खात्याला हटविण्याची सूचना करावी, असे वकिलांनी यावेळी सांगितली. बार असोसिएशनचे उपाध्यक्ष शितल रामशेट्टी, उपाध्यक्ष विजय पाटील, जनरल सेक्रेटरी अॅड. वाय. के. दिवटे, सदस्य इरण्णा पुजेरींसह पदाधिकारी व वकील हजर होते.









