नुकसानीचे पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
ओटवणे प्रतिनि
मंगळवारी दाणोली गावठण येथे ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची बुधवारी दुपारी सावंतवाडीचे नायब तहसिलदार मनोज मुसळे आणि आणि महसूल खात्याच्या अधिकारी वर्गाने पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी वर्गाला दिल्या. यावेळी मंडळ अधिकारी संजय यादव, वरिष्ठ लिपिक स्वप्निल प्रभू, दाणोली तलाठी सचिन चितारे, कृषी सहाय्यक श्री तोतावडे, पोलीस पाटील सचिन सावंत, बंटी लटम आदी उपस्थित होते.









