रंगपंचमीदिवशी रात्री उशिरापर्यंत घेतला आढावा : आवश्यक दुरुस्त्या करण्याची सूचना
बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे. मतदारयादी तयार करण्यासह मतदान केंद्रे सज्ज ठेवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने रंगपंचमीदिवशी सर्वत्र रंगोत्सवाची धामधूम सुरू असतानाच सायंकाळच्या सत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात फेरफटका मारून मतदान केंद्रांचा आढावा घेतला. निवडणूक आयोगाकडून विविध सूचना जिल्हा निवडणूक विभागाला करण्यात आल्या आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह महापालिका यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. निवडणुकीची घोषणा कोणत्याहीवेळी होण्याची शक्मयता असून निवडणूक मतदान केंद्रे सज्ज ठेवण्याची सूचना केली आहे. त्यादृष्टीने महापालिका व्याप्तीमधील मतदान केंद्रांची पाहणी मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, महापालिका आयुक्त ऊद्रेश घाळी, महापालिका सामान्य प्रशासन उपायुक्त भाग्यश्र्री हुग्गी, महसूल उपायुक्त प्रशांत हनगंडी, महसूल निरीक्षक एल. एस. बचलपुरी आदींसह मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.
शहरात होळी उत्सवानिमित्त सर्वत्र रंगपंचमी साजरी करण्यात आली. तर मंगळवारी दिवसभर रंगपंचमीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. मात्र सरकारी सुटी नसल्याने मनपाच्या अधिकाऱ्यांनी आपले कामकाज सुरू ठेवले होते. त्यामुळे मंगळवारी सायंकाळच्या सत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी वडगाव परिसरातील मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जेल शाळेला भेट देऊन त्याठिकाणच्या इमारतींची तसेच अन्य सुविधांची माहिती जाणून घेतली. दिव्यांग मतदारांना ये-जा करण्यासाठी रॅम्प निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच पाण्याची सुविधा, निवडणूक अधिकाऱ्यांसाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध आहेत का, याची माहिती घेतली. त्याचप्रमाणे ज्याठिकाणी इमारती नादुऊस्त आहेत, रॅम्पची सुविधा नाही आणि इमारतींच्या खिडक्मया-दरवाजे व्यवस्थित नसल्यास दुऊस्ती करण्याची सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.









