बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आज अधिकाऱ्यांसह मुत्त्यानहट्टीला भेट देऊन परिसराची पाहणी केली. परिसरातील नागरिकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासंदर्भात आणि त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.
यावेळी राजू सेठ यांनी रहिवाशांना आश्वासन देताना सांगितले की, या भागातील समस्या सोडवण्यासाठी ते स्वतः अधिकाऱ्यांसह प्रयत्न करतील. तसेच सर्व विकास कामांवर बारकाईने लक्ष ठेवतील. यावेळी येथील नागरिकांनी राजू सेठ यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्याबद्दल आभार मानले.
शहराचा विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करणे आणि प्रत्यक्ष लोकांशी भेटून त्यांच्या समस्या सोडवणे हे आपले सुरवातीपासूनच ध्येय असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत अधिकारीही उपस्थित होते.









