सातारा :
स्वच्छता सर्वेक्षण 2025 अंतर्गत सातारा जिह्यातील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन व गोबरधन आदर्श प्रकल्पांची केंद्रीय स्वच्छता समितीचे अधिकारी कुणाल भावसार यांनी केली. यामध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची पहाणी विंग व कवठे (ता. खंडाळा) तर वाई तालुक्यातील वेळे गावचा गोबरधन प्रकल्पाची पाहणी केली. वाई, सातारा, पाचगणी येथील नगरपालिकेच्या मैला गाळ प्रकल्पाची पाहणी केली. तर मसूर (ता. कराड) येथील प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली.
महाराष्ट्र राज्यातील विविध उपक्रमांची पाहणी करताना विशेषत: सातारा जिह्यातील सर्व प्रकल्प कार्यान्वित असून ते चांगल्या पद्धतीने राबविले जात असल्याचे समाधान समिती प्रमुख कुणाल भावसार यांनी केले. विशेषत: वेळे (ता. वाई) येथील गोबरधन प्रकल्प पाहून त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी अंगणवाडी, डेमो घरकुलांना मिळणारा बायोगॅस ही पर्यावरण पूरक संकल्पना समितीने प्रत्यक्ष पाहिली. वेळे गावातील उपक्रमातील सहभागावर समाधान व्यक्त केले.
या दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर वेळे गावातील नागरिकांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. यावेळी दिल्ली येथील ए.एम.आय.एस. अॅकॅडमीचे अध्यक्ष कुणाल भावसार, सातारा जिल्हा परिषदेचे स्वच्छता तज्ञ अजय राऊत, रविंद्र सोनवणे, रोहित जाधव यांच्यासह सरपंच अर्चना गायकवाड, उपसरपंच राहुल ननावरे, माजी उपसरपंच उषा पवार, ग्रामपंचायत सदस्य सिंधू ढमाळ, निलम नलावडे, दशरथ पवार, विजय पवार, दिपक पवार, ग्रामविकास अधिकारी श्रुतिका जाधव, महिला ग्रामसंघ अध्यक्षा सीमा जगताप, कोष्याध्यक्ष आशा पवार, कृषी सखी मनिषा पवार, सी.आर.पी. पूजा लांडगे तसेच महिला बचत गट सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- जिल्ह्यातील सर्व प्रकल्प राज्यात आदर्श ठरतील
जिह्यातील सर्व प्रकल्प कार्यान्वीत आहेत. गावकऱ्यांच्या सहभागातून राबविलेल्या या स्वच्छता प्रकल्पामुळे जिह्यातील सर्व प्रकल्प राज्यात आदर्श ठरतील, असे मत केंद्रीय तपासणी समितीचे प्रमुख कुणाला भावसार यांनी व्यक्त केले.








