वार्ताहर/कडोली
मंगळवारी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, पोलीस उपायुक्त जगदीश रोहण, काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी दुपारी कडोली गावाला भेट देवून निरीक्षण केले.अलिकडच्या काळात कडोली गावात अनेक अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या गावाकडे जातीने लक्ष घातले आहे. या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी खबरदारी घेण्यासाठी आणि गणेशोत्सव मंडळांना सूचना करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी भेट दिली. विशेष करून चंद्रशेखर आझाद गल्लीतील प्रार्थनास्थळ आणि तेथील सार्वजनिक गणेश मंडपाला भेट दिली आणि तेथील पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी इतर सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचेही लवकरच विसर्जन करण्याच्या सूचना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी केल्या.









