खानापुरातील पडझड झालेल्या शाळांचा अहवाल उच्च न्यायालयाकडे देणार
प्रतिनिधी /खानापूर
कर्नाटक उच्च न्यायालय सेवा प्राधिकारण समितीच्या आदेशानुसार बेळगाव जिल्हा न्यायालय प्राधिकारण समितीच्यावतीने खानापूर तालुक्मयातील पडझड झालेल्या शाळांची पाहणी करण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी खानापूर न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यनारायण, प्राधिकारणचे सेपेटरी बेळगाव न्यायालयाचे न्यायाधीश मुरलीमनोहर रेड्डी, खानापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष आय. आर. घाडी, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांनी गर्लगुंजी, तोपिनकट्टी, मुडेवाडी, बरगाव या गावातील पावसामुळे पडझड झालेल्या शाळांची प्रत्यक्ष पाहणी केली
आहे.
या शाळेंचा पडझडीचा संपूर्ण अहवाल कर्नाटक उच्च न्यायालयाच्या प्राधिकरणाला देण्यात येणार आहे. शासनाकडून पडझड झालेल्या शाळांच्या नवीन इमारती बांधण्याच्या सूचना तसेच पाठपुरावा या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे न्यायाधिश व प्राधिकरणचे सेपेटरी मुरलीमनोहर रेड्डी यांनी सांगितले. तसेच तालुक्मयातील इतर शाळांच्या समस्यांचा अहवाल गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांना तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
येत्या कांही दिवसात अहवाल उच्च न्यायालयाच्या सेवा प्राधिकरणाला पाठवण्यात येणार आहेत, असे खानापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष आय. आर. घाडी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.









