सांगली :
बंद पडलेल्या 134 कारखान्यांची येत्या आठवड्यात तपासणी करा. अंमली पदार्थ विरोधी कारवाया कडक करा. त्याचा आढावा दर आठवड्याला घेण्यात येणार आहे. अंमली पदार्थ प्रा†तबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने कायद्याचा धाक निर्माण करावा. अंमली पदार्थ लागवड, वाहतूक, ा†वक्री व तस्करी करणाऱ्यांची गय करू नये, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अंमली पदार्थ टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) च्या प्रादा†शक आ†धकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, बाळासाहेब यादव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवायांचा आढावा घेतानाच कडक कारवाईच्या सुचना दिल्या.
अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांसाठी पालकमंत्र्यांच्याच अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ प्रा†तबंधक उपाययोजना समिती (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आली आहे. या टास्क फोर्समध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक, एम.आय.डी.सी.च्या प्रादा†शक आ†धकारी, स्था†नक गुन्हे अन्वेषण ा†वभागाचे पोलीस ा†नरीक्षक, सहाय्यक आयु‹, औषध ा†वभाग हे सदस्य आहेत. या टास्क फोर्सच्या कामा†गरीचा दर आठवड्याला ते आढावा घेणार आहेत. मागील आठवड्यात केलेली कामा†गरी, पुढील आठवड्यातील ा†नयोजन करण्यात येईल. कारवाईत येणाऱ्या अडचणी व आव्हाने याचा आढावा घेतला जाणार आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अंमली पदार्थांच्या दुष्पा†रणामसंदर्भात जनजागृती करावी. या पदार्थांचे दुष्पा†रणाम सांगणारी लघा†चत्रफीत तयार करावी. शाळा महा†वद्यालयातील मुले, युवकांना अंमली पदार्थांचे दुष्पा†रणाम समजून सांगावेत, जेणेकरून भावी ा†पढी यापासून दूर राहू शकेल. आगामी कालावधीत आपण वैया†‹करीत्या शाळा महा†वद्यालयांना भेट देऊ, असे ते म्हणाले.
- टास्क फोर्सने स्वत:चा आराखडा तयार करावा
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिह्यातील सर्व औद्योा†गक क्षेत्रातील 134 बंद कारखाने तपासणी मोहिमेसाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र आदेश निर्गामित करावेत. अंमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी टास्क फोर्सने स्वत:चा आराखडा तयार ठेवावा. नागरिकांना विश्वास द्यावा. पोलिसांनी गस्त वाढवावी. गोपनीय खबर मिळण्याचे प्रमाण वाढा†वण्यासाठी प्रयत्न करावेत. अंमली पदार्थ विरोधी कारवाई केल्यानंतर अशा खटल्यात कोणतीही त्रुटी ठेवू नका. अंमली पदार्थ तस्करांना कडक शिक्षा होण्यासाठी पुरावे गोळा करा. त्याचबरोबर मा†हती देणाऱ्यांना संरक्षण देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.








