देवगड / प्रतिनिधी
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आयएनएस गुलदार”ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांच्या प्रयत्नांतून ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरात येणार आहे. यासाठी विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्री नीतेश राणे यांची भेट घेतली होती. ही नौका पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक विजयदुर्गला येणार आहेत. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. नौकेचे स्थलांतर कर्नाटक येथील बंदरातून करण्यात येणार असून पर्यटन महामंडळाने त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. भारतीय नौदलाच्या लँडिंग शिप टैंक (मध्यम) श्रेणीतील आईएनएस गुलदार हे जहाज त्याच्या सामरिक क्षमतांमुळे नौदलाचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. हे जहाज ३० डिसेंबर १९८५ रोजी नौदलात दाखल झाले होते. आईएनएस गुलदार हे नाव भारतीय बिबट्याच्या प्रजातीवरून ठेवण्यात आले आहे. या नौकेचे बोधवाक्य ‘प्रथम आणि निर्भय’ असे आहे.
Previous Articleरत्नागिरी विमानतळाचे १० टक्के काम पूर्ण
Next Article भांबेडमध्ये काजू बागेला आग









