ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘INS विक्रमादित्य’ या भारताच्या विमानवाहू युद्धनौकेवर आज सकाळी छोट्या स्वरूपात आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, आगीमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. युद्धानौकेवरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे नौदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
आयएनएस विक्रमादित्य ही युद्धनौका सध्या कारवारच्या बंदरामध्ये आहे. त्याच्या सेलर अ ॲप कोमोडेशन कम्पार्टेमेंटमध्ये म्हणजेच नौदलाच्या सैनिकांना राहण्यासाठी राखीव असलेल्या भागात ही आग लागली. आगीची माहिती मिळताच फायर फायटिंग ऑप्रेशन लॉन्च करुन तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. युद्धनौकेचेही कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.









