ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यलयात मोहन भागवत यांची भेट घेतल्यानंतरच त्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. हे संशयास्पद वाटते, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. पटोलेंच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
पटोले म्हणाले, वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरू झाल्यापासून भाजपचे नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. वानखेडे नागपूरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटले आणि त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे. हे संशयास्पद वाटते. त्यांची चौकशी सुरू होण्याची कारणं काय? ‘दाल में कुछ काला है’ असे दिसत आहे. या प्रकरणात काही ना काही लपलेले आहे.
समीर वानखेडे यांच्याकडे काहीतरी अशी माहिती आहे, ज्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपची पोलखोल ते करू शकतात, त्यामुळेच वानखेडेंची चौकशी सुरू असावी, असेही पटोले म्हणाले.









