खानापूर तालुक्यातील भुरुणकीला दिली भेट
बेळगाव : जिल्हा अनुसूचित जाती-जमाती कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी खानापूर तालुक्यातील भुरुणकी येथे सिद्धी समाजाच्या नागरिकांची भेट घेऊन तेथील समस्यांविषयी चर्चा केली. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या सूचनेवरून अनुसूचित जाती-जमाती कल्याण विभागाचे अधिकारी बसवराज कुरिहुली यांनी भुरुणकीला भेट दिली. सिद्धी कॉलनी येथील नागरिकांनी पाण्याची व्यवस्था, कायमस्वरुपी घरे, जमीन, शिक्षण, विद्यार्थी वसतिगृह आदी समस्यांविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आरोग्य सेवा पुरविण्यासंदर्भातही त्यांनी विनंती केली.









