Inquire about electronic trains – Baban Salgaonkar
गेल्या काही दिवसापासून नवीन आलेलया इलेक्ट्रॉनिक रिक्षा गाड्या काही दिवस बंद अवस्थेमध्ये होत्या . सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या पाच गाड्या खरेदी केलेल्या आहेत. या गाड्या सुरुवातीपासूनच वादातील असून याच्यातील एक गाडी अपघातग्रस्त होऊन गॅरेज मध्ये आहे . सदर गाडी चालवणे कर्मचाऱ्यांना वाहतूक करणे धोकादायक झालं असून सदर वाहन कधीही एका बाजूला झुकत आहे. भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, याकरिता या वाहनांच्या खरेदी बाबत व्यवहाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. या गाड्यांच्या व्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









