क्रायोजेनिक टँक बनवणारी कंपनी : सेबीकडे रितसर अर्ज दाखल
वृत्तसंस्था / मुंबई
क्रायोजेनिक टँक (टाकी) निर्मिती करणाऱ्या आयनॉक्स इंडिया यांनी आपला आयपीओ आणण्याचे निश्चित केले असून त्याकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे नुकतीच बाजारातील नियामक सेबीकडे सुपुर्द केली आहेत. या आयपीओच्या माध्यमातून ताजे इक्विटी समभाग कंपनी जारी करणार आहे. ऑफर फॉर सेल अंतर्गत कंपनीच्या सध्याच्या प्रवर्तक व समभागधारकांद्वारे 2.21 कोटी समभागांची विक्री केली जाणार आहे. सिद्धार्थ जैन, पवनकुमार जैन, नयनतारा जैन, इशिता जैन आणि मंजू जैन यांच्याकडून समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री केले जाणार आहेत.
काय करते कंपनी
क्रायोजेनिक टँक (टाकी) बनवणारी देशातील प्रमुख कंपनी म्हणून आयनॉक्स इंडियाचा उल्लेख केला जातो. क्रायोजेनिकसाठी आवश्यक डिझाईन, अभियांत्रिकी उत्पादन यासारख्या कार्याचा जवळपास 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव कंपनीपाशी आहे. कंपनी टँक्ससह इक्विपमेंट, इंडस्ट्रियल गॅस, एलएनजी, हेल्थकेअर, एव्हिएशन अशा क्षेत्रातील उद्योगांना मदत करत असते.









